सातारा : सासु सुनेला मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घराचे सांडपाणी न येण्यावरून गौरी प्रवीण भोसले, श्रीमती लिलाबाई तुकाराम भोसले (रा. उत्तर कोपर्डे, ता. कराड) यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच दिपाली रमेश भोसले व ताराबाई रमेश भोसले यांच्या विरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चारपळे करीत आहेत.