सातारा : मोळाचा ओढा येथून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान साहिल अतुल जाधव (रा. माची पेठ, सातारा) यांची मोळाचा ओढा सातारा येथील गजराज इंटरप्राईजेस दुकानाच्या समोर पार्क केलेली स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एमएच 11 डीएफ 0311 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.