सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याची सुमारास अहिरे कॉलनी सातारा येथे मोसिन मुन्ना खान (रा. संभाजीनगर, सातारा) याला कोयत्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शाहबाज शेख, विजय कारंडे, सागर लोहार (पूर्ण नाव, पत्ते माहीत नाहीत) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार देखणे करीत आहेत.