देशमुख नगर येथे किरकोळ वादातून महिलेसह मुलाला मारहाण; तिघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 27 August 2026


सातारा : घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करून महिलेशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25 रोजी बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. 38 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली. घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून आरोपींनी महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

धनंजय शशिकांत देशमुख याने महिलेचा हात ओढून तिच्याशी गैरवर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच तिघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी धनंजय शशिकांत देशमुख, अवनी धनंजय देशमुख आणि दया शशिकांत देशमुख (सर्व रा. देशमुख नगर, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कारळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजवाडा बसस्थानकाच्या पाठीमागील मंडईच्या बेसमेंटमधून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
संगम हौसिंग सोसायटी परिसरात भावजयच्या दगडफेकीत वृद्ध जखमी

संबंधित बातम्या