सातारा : राजवाडा बसस्थानकाच्या पाठीमागील मंडईच्या बेसमेंट पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे 50 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 रोजी सकाळी सव्वानऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ही घटना घडली. डिलिव्हरी बॉय प्रतीक प्रकाश देवरुखे (वय 21, रा. डबेवाडी) यांनी फिर्याद दिली.
शुभधन नानासाहेब धोंदवड यांच्या नावावर असलेली दुचाकी मंडईच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये लावण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने संमतीशिवाय ती चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शाहूपुरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बनकर करीत