सातारा : राजवाडा परिसरातील नगर वाचनालयासमोरील संरक्षण भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून 5 हजार 390 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले.
26 रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. या कारवाईत राजेश रामचंद्र काळेकर (वय 53) आणि विक्रम अनिल जमदाडे (वय 36, दोघे रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुगाराच्या अड्ड्यावरून रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल वैभव शिंदे यांनी ही कारवाई केली.