पैगंबरांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व शिरखुर्म्याचे वाटप; माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि खिदमत-ए-खल्कतर्फे आयोजन

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सातारा : हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साताऱ्यातील माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि खिदमत-ए-खल्क सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नानासाहेब पाटील जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.

संपूर्ण सृष्टीसाठी रहमत म्हणून पाठविण्यात आलेल्या हजरत मुहम्मद पैगंबर यांनी मानवता, बंधुभाव, समानता, एकता आणि गरजूंची सेवा करण्याचा संदेश दिला. याच शिकवणीला कृतीची जोड देत दोन्ही संस्थांनी रुग्णसेवा आणि रुग्णांच्या नातेवाईकांची सेवा करून मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला.

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन तसेच शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून धर्म, जात-पंथाच्या पलीकडे जाऊन गरजू माणसाची सेवा करण्याचा आणि समाजात बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे माधवराव सारडा, राधेशाम भंडारी,सुदीप भट्टड, शेखर शर्मा यांच्या मार्फत व उपस्थितीत तसेच खिदमत-ए-खल्क सामाजिक संस्थेचे सादिकभाई शेख, आरिफ खान, आसिफ खान, अब्दुल सुतार, अझहर मनेर, हाफिज मुराद, साहिर बागवान, जाकीर शेख, मुफ्ती बागवान,सलीम शेख पाळणे वाले,फिरोज शेख, सुहेल शेख ,अमजद शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“पैगंबरांची शिकवण केवळ सांगायची नाही, तर ती आपल्या आचरणातून समाजासमोर आणायची,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

संबंधित बातम्या