सातारा : युवतीला वेश्यागमनासाठी ठेवल्याप्रकरणी श्रीकांत सुर्यकांत जगताप (रा. सरदबझार, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाट्यावरील परी लॉजमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संबंधित युवतीची पोलिसांनी सुटका केली. ही घटना दि. 24 ऑगस्ट रोजी घडली आहे. पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.