पोलीस करमणूक केंद्रासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सातारा : एका युवकास मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातील राजपथावरील पोलीस करमणूक केंद्रासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाहनाला कट मारण्याच्या कारणातून राडा झाल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी फैजल खान व इतर सहा जणांविरुध्द ऋषीकेश सिध्देश्वर रोकडे (वय 19, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 ऑगस्ट रोजी घडली होती. शिवीगाळ, दमदाटी करत संशयितांनी फरशीचा तुकडा, लाकडी दांडक्याने हल्ला केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयत्याने हल्ला झालेल्या स्नेहलच्या संघर्षाचा अखेर अंत, अडीच महिने सुरु होती मृत्यूशी झुंज, पालघर येथे घडली होती संतापजनक घटना
पुढील बातमी
विकासनगर येथून दुचाकीची चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या