कराड तालुक्यातील सुपने आरोग्य केंद्रात साप घुसल्याने रुग्णांची धावपळ; स्थानिक तरुणांनी सापाला सुरक्षितपणे पकडल्याने धोका टळला

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सुपने : कराड तालुक्यातील सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी साप घुसल्याने रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. साप आरोग्य केंद्राच्या परिसरात आल्याचे निदर्शनास येताच रुग्णांची धावपळ उडाली. 

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत स्थानिक तरुणांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडले. त्यामुळे धोका टळला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याने सापांसह अन्य सरपटणारे प्राणी परिसरात येण्याची शक्यता वाढली आहे. 

त्यामुळे आरोग्य केंद्राच्या परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे तातडीने साफ करून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता अग्‍निसुरक्षा रामभरोसे; मागील फायर ऑडिटची मुदत ८ महिन्यांपूर्वीच संपली
पुढील बातमी
साताऱ्यात अंत्योदय कार्डवरील साखरेची खासगी दुकानात विक्री; दुकान संचालिकेवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा, २०७ किलो साखर जप्त

संबंधित बातम्या