सातारा : अल्पवयीन मुलीवर बापाकडूनच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या वडूज जिल्हा न्यायालयाने आरोपीस ठोठावली दहा वर्षे सक्तमजुरी व 35 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची हकीकत अशी, दि. १९/०८/२०२४ रोजी दुपारी शिंगणापूर ते मार्डी जाणारे रोडपासून काही अंतरावर मक्याचे पीक असलेल्या शेतात यातील आरोपी यांनी पीडीतेचा हात धरून पीडितेस मक्याच्या पिकात पीडितेची पॅन्ट व चड्डी काढली व जबरदस्तीने अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ती मोठमोठ्याने ओरडली त्यामुळे तेथे आजूबाजूचे लोक जमा झाले व त्या लोकांनी पीडितेस आरोपी जवळून बाजूला केले. म्हणून वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास करुन तत्कालीन तपासी अधिकारी चांदणी मोटे महिला पोलीस उपनिरीक्षक दहिवडी पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात सदर गुन्हयाचे दोषारोप पत्र पाठविण्यात आले होते.
सदरचा खटला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांच्या कोर्टात चालला होता. याकामी सरकारतर्फे श्री.अजित साबळे, अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि श्री. वैभव काटकर अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता यांनी खटल्याचे कामकाज पाहिले नमुद केसमध्ये एकुण 14 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा तसेच अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून व श्री.अजित साबळे, अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे यांचे दाखले न्यायालयात सादर केलेने समोर आलेला पुरावा ग्राहय मानुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी दि.२५/०८/२०२६ रोजी यातील आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 5 (n)(m) अन्वये दहा वर्षे सक्त मजुरी व 25,000 रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद आणि भारतीय न्यायसंहिता कलम 351(2) अन्वये 2 वर्षे सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या खटल्याकामी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे सातारा, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अंमलदार म्हणुन म पो हवा 2086 विजयालक्ष्मी दडस , पो.उप.नि. दत्तात्रय जाधव , पो.हवा.927 चेतन सानप , पो.कॉ. 585 सागर सजगणे पो.कॉ.292 अमीर शिकलगार यांनी कामकाज पाहिले.