आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर तातडीने कार्यवाही करा - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

by Team Satara Today | published on : 25 August 2026


सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’च्या बैठकीत सातारा व जावली तालुक्यांतील विविध आरोग्यविषयक प्रश्न, उपलब्ध सुविधा आणि आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासह आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या. आरोग्य विभागाचा कारभार अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

बैठकीला आमदार मनोज घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, कृषी सभापती लता कर्णे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, सातारा व जावली तालुक्यातील पंचायत समित्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची 1 सप्टेबर रोजी निवड; अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पुढील बातमी
विविध ठिकाणी महिला-मुलींसमोर असभ्य वर्तन करणार्‍या विकृताला अटक; सातारा शहर डीबी पथकाची कामगिरी

संबंधित बातम्या