सातारा : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम 2013 अन्वये महिलांच्या ज्या कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये 10 किवा 10 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी आहेत अशा कार्यालयामध्ये अधिनियमातील कलम 4 नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
समिती स्थापन झाल्यानंतर शासनाच्या ‘शी बॉक्स’ पोर्टलवर(SHE BOX PORTAL) वर नोंदणी करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात कार्यरत सर्व कार्यालयांमध्ये आस्थापनांनी शासनाच्या ‘शी बॉक्स’ पोर्टलवर(SHE BOX PORTAL) वर नोंदणी झाल्यानंतर अंतर्गत तक्रार निवारण समितीची संपूर्ण माहीती पोर्टलवर अद्यायावत करावी असे आवाहन सातारा जिल्हा महिला व बालिवकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे