सातारा : सदरबाजार चौकातील भीमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी परिसरात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 810 रुपये रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
सदर बाजार परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. छाप्यादरम्यान जुगाराचे साहित्य आणि रोकड पोलिसांच्या हाती लागली.
याप्रकरणी संतोष रामचंद्र आवळे (वय 48, रा. भीमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी, सदरबाजार, सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल फडतरे यांनी ही कारवाई केली.