सातारा : माळवाडी, सह्याद्री कॉलनी परिसरात जुन्या वादातून 40 वर्षीय महिलेला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोहित चित्तरंजन भुतकर (रा. समता पार्क, शाहूपुरी, सातारा) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि भुतकर हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून भुतकर याने महिलेशी वाद घातला. त्यानंतर तिला हाताने मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रोहित भुतकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक फौजदार यू. बी. माने करीत आहेत.