जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ म्हणून फलटणच्या सिद्धाली शहा ‘इंटरनॅशनल बुक’मध्ये; जागतिक नोंदीमुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा

by Team Satara Today | published on : 24 August 2026


फलटण :  अवघ्या २१ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येत फलटणच्या सिद्धाली अनुप शहा यांनी उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. ‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ म्हणून त्यांच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये अधिकृत नोंद झाली असून, संस्थेच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या जागतिक नोंदीमुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

फलटण नगरपालिका निवडणुकीत २१ डिसेंबर २०२५ रोजी सिद्धाली शहा यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत ही कामगिरी केली. त्यावेळी त्यांचे वय २१ वर्षे १० महिने पाच दिवस इतके होते. तरुण वयात सार्वजनिक जीवनात प्रवेश करून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच जागतिक विक्रमाच्या रूपाने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेल्याने त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर आणि ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांनी दाखविलेला विश्वास आणि भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची दिलेली संधी, तसेच मतदारांनी दाखविलेला विश्वास यामुळेच हे शक्य झाल्याचे सिद्धाली शहा यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल
पुढील बातमी
जिल्हा बँकेसाठी शिवसेना ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत; अंतिम याद्यांनंतरच शिवसेनेची भूमिका - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या