सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी स्मृती उद्यान परिसरात अंमली पदार्थाचे सेवन केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौद अहमद खान (रा. शाहूनगर, जगतापवाडी, कोडोली, सातारा) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.
22 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास स्मृती उद्यान-अजिंक्यतारा पायथा रोड परिसरात सौद अहमद खान हा गांजाचे सेवन करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलीस शिपाई अमोल बागल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.