साताऱ्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणेत आढळला; मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार

by Team Satara Today | published on : 23 August 2026


नागोठणे : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथून शुक्रवारपासून (दि. २१ ऑगस्ट) बेपत्ता झालेल्या रविराज माणिक साळुंखे (वय २७, मूळ रा. सातारा, सध्या रा. नागोठणे) या तरुणाचा मृतदेह शनिवारी बाळसई गावाच्या हद्दीत अंबा नदीपात्रात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविराजच्या मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

रविराज साळुंखे हा नागोठणेजवळील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होता. शुक्रवारी तो नागोठणे येथील घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी नागोठणे पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर बेपत्ता अशी नोंद केली होती. त्यानंतर नागोठणे पोलिसांनी रविराजचा शोध सुरू केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागेवाडी येथील आयटी पार्क प्रकल्पासाठी जागा हस्तांतरण अंतिम टप्प्यात; प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू
पुढील बातमी
कराडमधील एस.एस. मोबाईल शॉपीवर दरोडा; शॉपी फोडून सुमारे ३० लाख रुपयांच्या मोबाईलची चोरी

संबंधित बातम्या