फलटण : बंद खोलीचा फायदा घेत सुमारे ९६ हजार रुपये किमतीचे पितळी धातूचे गोल ताशे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला फलटण शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहित मनोज शिंदे (रा. शिवाजीनगर, फलटण) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत शुभम संतोष ओतारी (वय २७, रा. कसबा पेठ, फलटण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. यशवंतराव चव्हाण हायस्कूल, नाना पाटील चौक परिसरातील बाबू नाना पाटील यांच्या जागेमागील उघड्या खोलीत ताशे ठेवण्यात आले होते.
२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजता संशयिताने या खोलीत प्रवेश करून पितळी ताशे चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयिताच्या हालचालींची माहिती तपासली. त्यानंतर रोहित शिंदे याला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी रात्री ११.४६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील कलम ३०५(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.