सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खा. उदयनराजे यांनी घेतली रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट

मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा

by Team Satara Today | published on : 21 August 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खा. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची रेल भवन येथे भेट घेऊन चर्चा केली.

जरंडेश्‍वर स्थानकावर ११०३९/ ११०४० व ११४२५/ ११४२६ गाड्यांना थांबा देण्याची, तर कराड येथे १६५३३/ १६५३४, ११०४९/ ११०५० व २०६६९/ २०६७० गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली. सातारा येथे १९६६८/१९६६७, २२६८५/२२६८६ व १२६२९/ १२६३० गाड्यांना थांबा देण्याबरोबरच दादर-हुबळी एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.

सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पूर्ववत करावी, दादर-सातारा एक्सप्रेस दररोज चालवावी आणि राणी चेनम्मा एक्सप्रेस साताऱ्यापर्यंत वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चित्रपट अभिनेते बाळकृष्ण शिंदे यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश; मान्यवरांकडून अभिनंदन
पुढील बातमी
फेडेरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्सच्यावतीने छत्रपती शिवरायांची न्यूयॉर्कमध्ये मिरवणूक; इंडीया डे परेडमध्ये किर्तीरथ सातासमुद्रापार

संबंधित बातम्या