अधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 27 लाखांची फसवणूक; रवी शर्मा व एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 18 August 2026


सातारा : अधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 27 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 मे  ते 30 जुलै 2026 दरम्यान हर्षद विनेंद्रलाल शहा (रा. समर्थ नगर, सातारा) यांची अधिक परताव्याच्या आमिषाने 27 लाख 42 हजार 501 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रवी शर्मा व एका महिलेच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लिंब फाटा येथे चौघांना मारहाण केल्याप्रकरणी लिंब येथील सहा जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
जयसिंगराव करपे हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या प्रेरणेतून ‘साहित्यवेल वाचन प्रसार अभियानाचा’ प्रारंभ

संबंधित बातम्या