शिरवळला महामार्गावर भरधाव मोटार घुसली ट्रकखाली; वाठार स्टेशनचे दांपत्य जखमी

by Team Satara Today | published on : 18 August 2026


खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावर पुणे बाजूकडे जाताना भरधाव येणाऱ्या मोटारीने पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात मोटार ट्रकच्या खाली घुसली.अपघातात पती गंभीर जखमी झाला असून, पत्नी किरकोळ जखमी आहे. ही घटना आज दुपारी शिरवळ येथे घडली. एका आठवड्यात अपघाताची ही तिसरी घटना आहे.

याबाबत माहिती अशी, की साताऱ्याहून पुण्याला जाताना शिरवळ येथे वेगात येणाऱ्या मोटारीवरील (एएमएच ११ डीयू ७३०३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिने ट्रकला (एमएच १४ जीएल ३९००) पाठीमागून जोराची धडक दिली.

यामध्ये एअर बॅग उघडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, तर मोटारचालक विक्रम संभाजी दोरगे (रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांची पत्नी स्वाती विक्रम दोरगे या किरकोळ जखमी झाल्या असून, त्या शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तपास पोलिस हवालदार केंगळे करीत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कंत्राटदारांची ८६ हजार कोटींहून अधिकची बिले रखडली; कंत्राटदार महासंघासाजे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु
पुढील बातमी
संबोधीचा उपक्रम ध्येयाचे स्वप्न पेरणारा - प्राचार्य डॉ.संजय कांबळे; संबोधी प्रतिष्ठानतर्फे सातारा शहरातील ४० शाळा, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

संबंधित बातम्या