सातारा : जपान कराटे असोसिएशन (JKA) इंडियातर्फे आयोजित केलेल्या पहिल्या 'जे. के. ए. इंडिया ऑल इंटर-स्कूल टूर्नामेंट'साठी सातारा येथील 'टीम जे. के. ए. सातारा'च्या त्रिग्या सावंत, काव्या ठोके, समर्थ ठोके आणि ओजस्वी जक्का या चार गुणवंत खेळाडूंची निवड झाली आहे.
ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा दि. २१ ऑगस्ट ते २3 ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडणार असून, यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी सातारच्या 'टीम जे. के. ए.' मधील त्रिग्या सावंत, काव्या ठोके, समर्थ ठोके आणि ओजस्वी जक्का या चार खेळाडूंची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक विरेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाल्याबद्दल संपूर्ण सातारा जिल्ह्यातून 'टीम जे. के. ए. सातारा'च्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन होत आहे.