मांढरदेवच्या विद्यार्थिनींचा ठाणे येथे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्यात सन्मान

by Team Satara Today | published on : 18 August 2026


मांढरदेव : मांढरदेव येथील श्री. काळेश्वरी शिक्षण संस्था संचलित, न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२६’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान व पारितोषिक वितरण समारंभ ठाणे येथे उत्साहात  झाला.

या स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी  क्षितिजा नरसू मांढरे हिने राज्यस्तरीय चौथा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिला ७,५००/- रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच कु. वैदेही सुरेश मांढरे हिने राज्यस्तरीय पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल  ५,०००/- रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान व पारितोषिक वितरण समारंभ दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी गडकरी  रंगायतन, ठाणे येथे उत्साहात पार पडला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री ना.डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. 

 विद्यार्थिनींना शिक्षिका सौ. वैशाली देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  धर्माजी मांढरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक  धोंडिराम वाडकर, शिक्षकवृंद , पालक व मांढरदेव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; शिक्षेलाही स्थगिती
पुढील बातमी
सातारा येथील ‘टीम जे. के. ए.’च्या खेळाडूंची पहिल्या ऑल इंडिया इंटर-स्कूल स्पर्धेसाठी निवड; जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

संबंधित बातम्या