पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 17 August 2026


सातारा :  इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडुन राज्यातील महानगर पालिका, विभागीय शहरे जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणीक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहू नये यासाठी  पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 43 हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये  38 हजार प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

या योजनेंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एससी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबर पर्यत https://hmasnew.mahait.org  वर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.  महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्यान विभागाच्या सहायक संचालक सुजित बर्गे   यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ड्राय डे दिवशी अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर कारवाई; सात लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच; शंभूराज देसाईंची सावध भूमिका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे स्पष्ट

संबंधित बातम्या