ड्राय डे दिवशी अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर कारवाई; सात लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 17 August 2026


सातारा :  राज्य उत्पादन शुल्क साताराकार्यालयाच्या , भरारी पथकने  15 ऑगष्ट  रोजी  नवीन एम.आय.डी.सी. चंदननगर, कोडोली ता. सातारा येथे गोवा राज्यात निर्मित व फक्त गोवा राज्यात विक्रीस अनुमती असलेल्या मद्यावर कारवाई करून दोन आरोपींच्या ताब्यातून सात लाखाहून अधिकचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाईमध्ये मिळालेल्या माहितीनुसार वरील गुन्हयातील आरोपींनी अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे काही बॉक्स हॉटेल मोगरा, नागठाणे येथे दिले असल्याचे  सांगतले. नागठाणे, ता. जि. सातारा येथे तपासणी केली असता सदर ठिकाणी वरील अवैध गोवा बनावटीचे मॅकडॉल नं. १ विदेशी मद्याच्या १८० मि.लीच्या २७ बाटल्या व विनावाहतूक पासाचे मद्य आढळून आल्याने सदर अनुज्ञप्ती विरुद्ध महाराष्ट्र विदेशी मद्य नियम १९५३ चे विविध कलमान्वये विभागीय विसंगती प्रकरण नोंद केले आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा कार्यालयाने केली. सदर कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील,  विजय मरोड, सहा. दु.नि. नितीन जाधव, जवान अजित रसाळ, रमेश भुजबळ, विनोंद हिंगणे, अमित क्षीरसागर, अजित घाडगे, बाळासो पाचुंदे, आबासाहेब जानकर, आप्पासो काळे, किरण जंगम यांनी भाग घेतला सदर गुन्ह्याच्या पुढील तपास  अजय पाटील, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.

जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयाचे देण्यात यावी किंवा या विभागाचे टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉटस अप क्रमांक ८४२२००११३३ वर कळविण्यात यावी. बातमीदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन
पुढील बातमी
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या