सातारा-कराड महामार्गावर रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 17 August 2026


सातारा : सर्विस रोडच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान सातारा-कराड महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कडेला पार्क केलेली दिगंबर विष्णू कदम (रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. सातारा) यांची दुचाकी क्र. एमएच 50 पी 2048 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुमारे साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात ममता डेअरीच्या सात संचालकांवर गुन्हा
पुढील बातमी
पायी दिंडी वारीसाठी जातो असे सांगून गेलेला साताऱ्यातील एक युवक बेपत्ता

संबंधित बातम्या