सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 13 रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शिवथर, ता. सातारा येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बाळासो माने हे तेथीलच संतोष नारायण साबळे आणि हणमंत बाबुराव साबळे यांना समजपत्र देण्यासाठी गेले असता संबंधितांनी माने यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तसेच माने यांना धमकी देत नोटीस न घेता शासकीय कामात अडथळा आणला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.