सातारा : येथील शाहूनगर गोडोली जाधव कॉलनी येथे शनिवारी 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्नेहउदय महिला सामाजिक संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तीस रक्तदातेंनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले. तसेच मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप करून ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
शिबिरात बीपी पल्स व नाडी तपासणी करण्यात येऊन आयुर्वेदिक पूर्ण बॉडी चेकअप करण्यात आले. यावेळी तीनशे लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेवक सुशांत महाजन,महिला आघाडी सातारा जिल्हा संघटिका शिवसेना (उबाठा) अनिताताई जाधव, शिव आरोग्य सेनेचे (शिवसेना उबाठा) जिल्हाप्रमुख निमिष शहा, सामाजिक कार्यकर्ते नितीन सूर्यवंशी, प्रकाश घुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्नेह उदय महिला सामाजिक संस्था अध्यक्षा सौ. वैशालीताई माने, उपाध्यक्ष सौ. सुनीताताई जाधव, सचिव मनीषाताई खैरमोडे, खजिनदार ऐश्वर्याताई वाघमारे, संजय जाधव, युवासेनेचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सागर धोत्रे, मिनल शहा, लताताई भालेराव, सविताताई भोईटे, शुभांगीताई शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नेत्र तज्ञ डॉ. संतोष रनवरे, डॉ तमन्ना शेख, नाडी तज्ञ डॉ मनीषा पाटील, स्त्रीरोग तपासणी डॉ. शितल माने, आयुर्वेदाचार्य डॉ. मनोज पाटील, अक्षय ब्लड बँक सातारा या सर्वांनी वैद्यकीय सेवा देऊन आपला बहुमूल्य वेळ या शिबिरास दिला. स्नेह उदय महिला सामाजिक संस्थेने या सर्वांचे तसेच सर्व रक्तदात्यांचे आणि शिबिराला उपस्थित राहिलेले प्रतिष्ठित, ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे आभार मानले.