मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली; टायफॉइडचीही लक्षणे, गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

by Team Satara Today | published on : 15 August 2026


छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. दरम्यान,  आता जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे.त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मागील दोन दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि थंडी आहे.जरांगे पाटील यांना टायफॉइडची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांना पुढील चार दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली जात असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या संपूर्ण रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. 

जरांगे पाटील यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर कुटुंबीय व सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला. त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील ८६ आस्थापनांच्या तपासणीत चौदा अन्न व्यवसाय परवाने रद्द; ऑनलाइन अन्नविक्री केंद्रांसह हॉटेलांवर कारवाई
पुढील बातमी
पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ते संविधानाच्या चौकटीत बसणारे नाही : खासदार सुप्रिया सुळे; राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचाच, पुरावे सादर केले

संबंधित बातम्या