करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

by Team Satara Today | published on : 15 August 2026


सातारा :  करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, देश गौरव करणाऱ्या घोषणा, बँड पथक,  वाद्यवृंद व गीतमंचाने सादर केलेली देशभक्तीपर गीते, संगीत कवायत अशा उत्साही वातावरणात भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि करंजे येथील झेंडा चौक येथे साजरा करण्यात आला.

करंजे पेठ मधील 'झेंडा चौक' येथील ध्वजारोहण शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व करंजे मधील सामाजिक कार्यकर्ते मा. शंकरराव किर्दत यांच्या हस्ते करण्यात आले ,तर श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेज मधील ध्वजारोहण विद्यालयाचा माजी विद्यार्थी सत्यम धनावडे (नवनियुक्त असिस्टंट कमांडर, डी.वाय.एस.पी. समकक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीत कवायत व वाद्यवृंदाने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ.वत्सला डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, संस्था चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, संचालिका हेमकांची यादव,सौ. पवार मॅडम श्री एल.जी.देशमुखसर रवींद्र जाधव,  सारंग पाटील व इतर सर्वच संचालक, विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक,श्री शेलार, श्री. श्रीरंग चव्हाण शिक्षक,  गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक रवींद्र निकम , शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प - पालकमंत्री शंभूराज देसाई; मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात
पुढील बातमी
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आठवणींचा फोटोसंग्रह प्रकाशित करा : पृथ्वीराज चव्हाण; कोल्हापूर येथे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली

संबंधित बातम्या