अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चोरगेवाडी, ता. सातारा येथे आशिष दिलीप शिंदे (रा. वेळे, ता. सातारा) याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगात, बेजबाबदारपणे चालवून दूध घालत असणाऱ्या  तेथीलच तुकाराम अण्णा घोरपडे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तुकाराम घोरपडे हे जखमी झाले असून आशिष शिंदे यांच्या विरोधात विनोद तुकाराम घोरपडे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘भारत माता की जय, वंदे मातरम’ने दुमदुमली सातारानगरी ; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज रॅली उत्साहात
पुढील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या