जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे : सुषमा राजेघोरपडे

जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर पदाधिकार्‍यांनी वचक ठेवण्याची निवेदनाद्वारे मागणी

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा  : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत शाळांमध्ये सदोष बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये उंब्रज, चाफळ आणि मांडवे शाळेचा उल्लेख करता येईल.् सुदैवाने यामध्ये कोणतीही गंभीर दुर्घटना झाली नाही. मात्र यापुढे अशीच परिस्थिती राहिल्यास दुर्घटना होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका आहे.् सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील प्राथमिक शाळेचे उदाहरण ताजे आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी सातारा जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताईताई शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच 1 जुलैपासून बंद असलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात यावी. कारण ग्रामीण भागातील 16 लाखांहून अधिक लोकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेचा फायदा होत होता. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तो एक आधार होता. त्याद्वारे नागरिक आपल्याला आलेली अडचण इतर लोकांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत तातडीने पोहोचवत होते. ही यंत्रणा बंद असून ते नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घातक आहे. याची चालू करण्याची कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली 

गेल्या काही दिवसात जिल्ह्यात नाडे नवारस्ता, बेलवडे, मल्हारपेठ येथे नऊ म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच खातवळ येथे 19 मेंढ्या शिळ्या मृत्युमुखी पडल्या.् या मृत्युमुखी जनावरांच्या बदल्यात त्या पशुपालकांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच यापुढे अशा कोणत्याही दुर्दैवी घटना जिल्ह्यात होऊ नयेत यासाठी योग्य उपयोजना पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली

सातारा जिल्हा परिषदेतील प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर पदाधिकार्‍यांचा वचक नसल्यामुळे पदाधिकारी बेफाम झाले आहेत. ते स्थायी समिती सारख्या महत्त्वाच्या बैठकीला ही उपस्थित राहत नाहीत. ही पदाधिकार्‍यांच्या आणि जिल्हा परिषदेच्या दृष्टीने कमीपणाची बाब आहे. येणार्‍या काळात अधिकारी व कर्मचार्‍यांची याच पद्धतीची वागणूक राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत. आणि नागरिकांप्रती अधिकारी व कर्मचार्‍यांच्या असणार्‍या जबाबदार्‍या ते पार पडतील असे मागणीही त्यांनी यावेळी केली

यावेळी अनिता जाधव, मालन परळकर, उज्वला सुतार, हाजरा शिकलगार, तबस्सुम मुल्ला, शोभा गोळे, अंजुम पठाण, प्राची ताकतोडे, नाही मनेर, श्रीकांत कांबळे आणि अभिजित खापे उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
टोलवसुली सुरू, रस्ते मात्र खड्ड्यात; ज्येष्ठ नागरिक संघटनांचा प्रशासनाला सवाल

संबंधित बातम्या