जि. प. सातारा प्रांगणात सुरक्षित फवारणी अभियान 2026 चा शुभारंभ व रथाचे उद्घाटन उत्साहात

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा : कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी विभाग जिल्हा परिषद सातारा आणि सिंजेन्टा इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित फवारणी अभियान 2026 चा भव्य शुभारंभ तसेच सुरक्षित फवारणी रथ उद्घाटन सोहळा आज, दिनांक 13 रोजी जिल्हा परिषद प्रांगणात पार पडला.

हा कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन आणि कृषी व दुग्धशाळा समितीच्या सभापती सौ. लताताई कर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

कृषी विभागच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम जिल्हात राबणार आहे. सुरक्षित फवारणी रथाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात जाऊन सर्व गावांमध्ये सुरक्षित फवारणी विषयी जनजागृती करण्यात येणार आहे, तसेच या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा, फवारणी करणार्‍या मजुरांचे समुपदेशन व फवारणी किट वाटप, तालुक्यातील शासकीय कार्यालयात सुरक्षीत फवारणी विषयी जनजागृती करणारे होर्डिंग्ज/बॅनर लावणार इत्यादी कार्यक्रम या अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्हाभर राबविणार आहे.

याप्रसंगी कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, मोहीम अधिकारी माळवे, तसेच सिंजेन्टा कंपनीचे प्रतिनिधी पी. जगदीशा, मनोहर तबारे व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सुरक्षित फवारणी रथाचे अनावरण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात चिमुकल्याचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा
पुढील बातमी
टोलवसुली सुरू, रस्ते मात्र खड्ड्यात; ज्येष्ठ नागरिक संघटनांचा प्रशासनाला सवाल

संबंधित बातम्या