सडा वाघापूर आणि सडा दाढोली परिसरातील पवनचक्की कंपनीच्या केबल चोरणा-या टोळीला अटक; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 13 August 2026


पाटण : सडा वाघापूर आणि सडा दाढोली परिसरातील पवनचक्की कंपनीच्या केबल चोरणा-या टोळीला पाटण पोलिसांनी अखेर जेरबंद केले. सहा जणांच्या टोळीकडून पोलिसांनी केबल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

कराड तालुक्यातील रूपेश दिलीप पाटील (रा. पोतले), राहुल दादासो कदम (रा. वडगाव), संतोष शामराव सरगर (चिखली), अनिल यशवंत सुतार (रा. सुतारवाडी, सणबुर, ता. पाटण), बबन बापू कस्तुरे आणि कृष्णत धोंडीराम गावडे (दोघेही रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.

पाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात पवनचक्क्यांची केबल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेल्या चो-यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश तारू यांच्या पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सहा आरोपींना अटक केली.

उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या सूचनेनुसार पाटण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, राजेंद्र सदगर, संजय राऊत, आनंदा आव्हाड, पोलिस हवालदार वैभव पुजारी, उमेश मोरे, अमृत आळंदे, दादासो लोंढे, आबासाहेब गलांडे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सायबर चोरीतील ८९ लाख रुपये साताऱ्यातील तरुणाच्या खात्यावर; सातारा सायबर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा, आंतरराज्य टोळीचे कनेक्शन
पुढील बातमी
जोपर्यंत मोदी अन् अमित शाह राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत त्या दोघांनाही शांत झोप लागणार नाही - राहुल गांधी, विविध मुद्यांवरून जोरदार हल्लाबोल

संबंधित बातम्या