जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू; 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत

by Team Satara Today | published on : 12 August 2026


सातारा  :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालू शैक्षणिक वर्षातील सातारा जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची  प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अधिकृतपणे सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन सातारा समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 

जिल्ह्यात मुलांची 7 व मुलींची 9 मिळून एकूण 16 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी सातारा शहरात मुलांचे एक व मुलींची दोन वसतिगृहे असून  कराड, पाटण, दहिवडी, खटाव,व  फलटण येथे मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह आहे. तसेच खंडाळा व वाईः- मुलींचे वसतिगृह असून कोरेगाव येथे मुलांचे वसतिगृह आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख 15 सप्टेंबर, 2026 आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी https://hmasnew.mahait.org  या पोर्टलला भेट द्यावी

 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागा उपलब्ध होणार नाही, त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने दिला जाईल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  ज्यांचा वसतिगृहात प्रवेश झालेला नाही. परंतू, वसतिगृहासाठी पात्र आहेत, अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विषारी औषध प्राशन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
पुढील बातमी
स्वातंत्र्यदिनी साताऱ्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन

संबंधित बातम्या