सातारा : विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि. 10 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष संपत निंबाळकर (वय 45, रा. तुकाईवाडी, ता. जि. सातारा) यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया मेश्राम यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.