सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी सातारा शहरात राहणारी एक 22 वर्षीय युवती तिच्या दुचाकीवरून मोळाचा ओढा ते कमानी हौद जात असताना शौर्य माने (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने संबंधित युवतीकडे पाहून असभ्य वर्तन केले. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.