सातारा : हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक उर्फ सोमनाथ गणेश आवारे (रा. कोंडवे, ता. सातारा) याला हद्दपार केले असताना तो हद्दपार आदेशाचा भंग करून दि. 9 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरातील आझाद नगर, मोळाचा ओढा येथील परिसरात आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.