दुचाकीस्वारास धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : अपघातात एकाच जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते गोडोली नाका रस्त्यावर अक्षयकुमार अनिल साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा) याने त्यांच्या ताब्यातील ईरटीका कारने राहुल मधुकर माने चालवीत असलेल्या दुचाकीला धडक देऊन अपघात केला. या अपघातात माने जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्लॉट देण्याच्या आमिषाने वृद्धाची सुमारे 39 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा
पुढील बातमी
हद्दपारआदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोंडवे येथील एकावर गुन्हा

संबंधित बातम्या