प्लॉट देण्याच्या आमिषाने वृद्धाची सुमारे 39 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : प्लॉट देण्याच्या आमिषाने एका वृद्धाची सुमारे 39 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 ऑक्टोबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान सखाराम गोविंद देवधर ( रा. भवानी पेठ, सातारा यांना सातारा येथे प्लॉट देतो, असे सांगून नारायण रामकृष्ण बहुलेकर (रा. शनिवार पेठ, सातारा), व तेजस राजकुमार जाधव (रा. सोमवार पेठ सातारा) यांनी देवधर यांच्याकडून 39 लाख 2700 घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मोहोड पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शासकीय कामांसाठी भाजपाचे सेवा अभियान; सातार्‍यात 13 ऑगस्टला निवेदने स्वीकारली जाणार
पुढील बातमी
दुचाकीस्वारास धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

संबंधित बातम्या