मलकापूर येथील डुबलनगर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने वार करून खून; पती पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 10 August 2026


मलकापूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मलकापूर, ता. कराड येथील डुबलनगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित पती दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहिणी दत्तात्रय जांभळे (वय अंदाजे ३०) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर दत्तात्रय नारायण जांभळे (मुळ. रा. आणे ता. कराड ) असे संशयित पतीचे नाव आहे. 

पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय जांभळे हे पत्नी कुटुंबासह सहा महिन्यापूर्वी येथील डुबलनगरमध्ये वास्तव्यास आले होते. रविवारी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय व रोहिणी यांच्यामध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी दत्तात्रय याने रोहिणी यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखील मगदूम, अशोक भापकर, पोलीस निरीक्षक दिपक वागवे, यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. काही वेळातच संशयित पती दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. तपासाला गती दिली असून खुनामागील नेमके कारण काय, हे शोधण्याचे काम सुरू आहे.

ठसेतज्ञ व अधिकारी घटनास्थळी दाखल

मलकापूर ता कराड येथील दुबल मगर मध्ये असलेल्या मंगलमूर्ती अपार्टमेंट च्या फेज वन मधील पहिल्या मजल्यावर पतीने पत्नीचा खून केला आहे या कुणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी ठसे तज्ञ व अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी मुंबईतील निवासस्थानी शरद पवार-शंभूराज देसाई यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
पुढील बातमी
‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; राज्यात पुन्हा खळबळ

संबंधित बातम्या