मालकास फसवून चालक ट्रक घेऊन परागंदा

by Team Satara Today | published on : 09 August 2026


सातारा : ट्रक मालकास फसवून चालकाने ट्रक चोरून नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय संजय साळुंखे रा. खिंडवाडी, सातारा यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक एमएच 09 ईएम 0567 हा विश्वासाने तेथीलच शालम मेहबूब शेख याला चालवण्यास दिला होता. मात्र दि. 27 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिवराज पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानातून चालक ट्रक घेऊन पसार झालेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला नगरसेविकांच्या हस्ते कास धरणाचे जलपूजन आणि पारंपारिक पद्धतीने ओटी भरण

संबंधित बातम्या