सातारा : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. पॉवर हाउस परिसरातील मोकळ्या मैदानात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
संतोष चंद्रकांत कुऱ्हाडे (वय ३८, रा. ९९६, मंगळवार पेठ, सातारा) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोकळ्या मैदानात मद्यसेवन करून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कुऱ्हाडे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.