आदेशाचे उल्लंघन करून तडीपार गुंड हत्यारासह ताब्यात; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 08 August 2026


सातारा : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून लोखंडी हत्यारासह शाहूपुरी परिसरात वावरल्या प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्मितेश उर्फ सागर दिलीप उंबरकर (रा. सैदापूर, सातारा) याला सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असताना तो लोखंडी हत्यारासह आझाद नगर, मोळाचा ओढा परिसरात वावरताना आढळून आला. याबाबतची फिर्याद संग्राम शशिकांत फडतरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वृद्धावर कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; गोजेगावमधील घटना
पुढील बातमी
कोडोली येथे सुमारे चार लाखांची घरफोडी; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या