वृद्धावर कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; गोजेगावमधील घटना

by Team Satara Today | published on : 08 August 2026


सातारा : एका वृद्धावर कुऱ्हाडीने वार करून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास बाबुराव पिलु जाधव (वय 72, रा. गोजेगाव, ता. सातारा) हे त्यांच्या सुनेसोबत घरासमोरील शेडमध्ये बोलत बसले असताना तेथीलच रोहित गुलाब जाधव याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने बाबुराव जाधव यांच्यावर वार करून सुनेस मारहाण केली आहे. याबाबतची फिर्याद संगीता बाबुराव जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आजारपणाला कंटाळून शाहूपुरीत एकाची आत्महत्या
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन करून तडीपार गुंड हत्यारासह ताब्यात; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या