श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये 'क्रांती दिन' उत्साहात साजरा; विद्यार्थ्याने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली

by Team Satara Today | published on : 08 August 2026


सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेज मधील समाजशास्त्र विभागाने क्रांती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे नियोजन संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय प्रियांका बाबर उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वक्तव्यातून गुड टच बॅट टच, निर्भया पथक, बाल गुन्हेगारी, मोबाईल हॅक कसा होतो याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.

देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या थोर क्रांतिकारकांप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या थोर कार्याच्या स्मृतींना उजाळा देणे व विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती ही मुल्ये रुजवणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन  केले तर काहींनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, शिरीष कुमार अशा विविध क्रांतिकारकांच्या कार्याचा व देशभक्तीचा परिचय करून दिला. तर काहींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. शाळेचा वाद्य वृंद आणि गीतमंचाने  आणि आयुष तुपे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमासाठी शुभम चव्हाण, सायली कुंभार, सोनम आतार,भागवत, मयुरेश नवघन, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक रवींद्र निकम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फुलांची रंगीबेरंगी दुनिया लवकरच कास पठारावर अवतरणार; पांढऱ्याशुभ्र चवर फुलांचे आगमन

संबंधित बातम्या