सातारा मध्यवर्ती बसस्थानकात तरुणाचे स्वतःवर वार; एसटी स्टँड परिसरात खळबळ, व्हिडिओ व्हायरल

by Team Satara Today | published on : 08 August 2026


सातारा : ​ शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी भरदुपारी एका तरुणाने धारदार चाकूने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

​तरुणाच्या हातात धारदार चाकू असल्याने आणि तो नागरिक जवळ येताच लांब पळत असल्याने त्याला पकडणे सुरुवातीला अवघड जात होते. एसटी स्टँड, स्टेडियम रोड आणि राधिका रोड परिसरात तो धावत सुटला होता. यादरम्यान काही नागरिकांनी धैर्याने पुढे येत स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या हातातील चाकू बाजूला काढला.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणाला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणाने हे टोकाचे पाऊल नक्की कोणत्या कारणातून उचलले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून मानसिक त्रासातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळा तालुक्यातील रुई येथील पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईसाठी बेमुदत धरणे आंदोलन

संबंधित बातम्या