कराड : तळबीड पोलीस ठाण्यात घाडगे-पाटील (निलेश सदाशिव घाडगे) ऍग्रो फूड्स अँड श्रीशा मसाले, प्लॉट क्र. डी-24, एमआयडीसी तासवडे, ता. कराड, जि. सातारा या कंपनीविरोधात सोयाबीन विक्री करूनही शेतकर्यांना पैसे न दिल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती तळबीड पोलिसांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच इतर परिसरातील ज्या शेतकर्यांनी संबंधित कंपनीला सोयाबीन विक्री केली असून अद्याप पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचीही फसवणूक झाली असेल, अशा सर्व शेतकर्यांनी तातडीने पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीची बिले, पावत्या, वाहतूक पावत्या, बँक खात्याचा तपशील तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह तळबीड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तळबीड पोलीस ठाणे (दूरध्वनी : 02164-258333) तसेच मोबाईल क्रमांक 9223006124, 9011087396 आणि 8888113312 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.