सातारा : दुचाकी चोरी प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरज शशिकांत राठी (रा. वाढे फाटा, सातारा. मूळ रा. अकोला) या युवकाची मित्राच्या ताब्यात असलेल्या दुचाकी (क्र. एमएच 12 एलएस 2641) चा धक्का एका दुसऱ्या दुचाकीला बसला. या कारणावरून दुसऱ्या दुचाकी वरील दोन अज्ञातांनी राठी यांची दुचाकी ताब्यात घेऊन सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे चला व तेथून तुमची मोटरसायकल घेऊन जावा, असे म्हणून संबंधित ठिकाणी दुचाकी घेऊन न जाता ती चोरी केली आहे. याबाबत संबंधित अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.